आजचा औद्योगिक भूखंडाचा प्रीमियम दर ५,००० रुपये प्रति चौरस मीटर आणि व्यावसायिक भूखंडाचा प्रीमियम दर ७,००० रुपये प्रति चौरस मीटर आहे.

संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहत मर्या. संगमनेर

१४ नोव्हेंबर १९८० रोजी स्थापन झालेली संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहत, महाराष्ट्र राज्यातील १२४ सहकारी औद्योगिक वसाहतींपैकी एक अग्रगण्य आणि विशाल औद्योगिक केंद्र म्हणून ओळखली जाते. एकूण २,३८,०१७ चौ.मी. क्षेत्रफळात विस्तारलेली ही वसाहत, दुष्काळग्रस्त भागाचा कायापालट करून शाश्वत आर्थिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कटिबद्ध आहे.

आमच्याकडे एकूण २६२ सुसज्ज भूखंड (Plots) असून, त्यापैकी १८३ दूरदृष्टी असलेल्या उद्योजकांना २२७ भूखंडांचे यशस्वी वाटप करण्यात आले आहे. विशेष अभिमानाची बाब म्हणजे, यातील १८० उद्योगांनी आपले उत्पादन प्रत्यक्ष सुरू केले असून, हे या वसाहतीचे यश दर्शवते. केवळ औद्योगिक भूखंडच नव्हे, तर व्यापाराला चालना देण्यासाठी आम्ही एक सुसज्ज व्यापारी संकुल उभारले आहे. यात एकूण २६ गाळे उपलब्ध असून त्यापैकी २३ गाळे व्यवसायांसाठी कार्यान्वित आहेत. स्थानिक रोजगाराला प्राधान्य देत, या वसाहतीद्वारे आज २,५०० ते ३,००० कामगारांना प्रत्यक्ष, तर सुमारे १,५०० लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे.

सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि उद्योगाभिमुख धोरणांच्या जोरावर, संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहत हा परिसर केवळ एक औद्योगिक पट्टा न राहता, समतोल आर्थिक प्रगतीचे एक भक्कम व्यासपीठ बनला आहे.

STICE

आमची यशस्वी कामगिरी आणि साध्य केलेली ध्येये

५.७६ कोटी + संस्थेचे एकूण वसूल भाग भांडवल
४००० + प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती
६८८ + एकूण सभासद संख्या
२६२ + एकूण भूखंड संख्या
१८० + उद्योगांचे उत्पादन प्रत्यक्ष सुरू
२६ + व्यापारी संकुल गाळे

संस्थेच्या माध्यमातून पुरविल्या जाणाऱ्या सुविधा

संस्थेने उद्योजकांच्या विकासासाठी विविध सोयी-सुविधा आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून दिलेले आहे.

अधिक पहा  
transportation
डांबरी रस्ते
water supply
पाणी पुरवठा
power supply
वीज विद्युत केंद्र
shops
व्यापारी संकुल
street light
स्ट्रीट लाईट
electrification
इलेक्ट्रीफिकेशन
common building
सामान्य सुविधा इमारत
assembly hall
सांस्कृतिक सभा मंडप
R. O. plant
आर.ओ. प्लान्ट
advertising board
जाहिरात स्ट्रक्चर बोर्ड

संस्था पदाधिकारी

सहकार आणि उद्योजकता यांचा संगम असलेली संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहत मर्या. ही संस्था संगमनेरच्या औद्योगिक विकासाचे नेतृत्व करते. संस्थेचे धोरणात्मक निर्णय आणि दैनंदिन कामकाज लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली चालते. दर पाच वर्षांच्या कालावधीसाठी संस्थेचे सभासद आपल्या प्रतिनिधींची निवड या मंडळावर करतात.

Kisan Thorat

श्री. किसन थोरात

चेअरमन
member image

श्री. नितीन हासे

व्हा. चेअरमन
ajay Rode

श्री. संतोष कोरे

मा. उपनिबंधक